To my beloved: MOM

                             

              To my beloved: MOM 

Aai, Amma, Mom — we call her by many names.
A mother is like that star in the sky that gives light in the darkness. In the same way, my mother brings light into my life.
She helps me make the right decisions in both good and bad times.

She is my lighthouse, leading me through the storms of life,
Helping me sail across the deep and vast ocean of existence.
A mother's love is immeasurable —
This love, you won't find in any shop,
For it is priceless, pure, and eternal.

Her day begins at 4 in the morning.
She prepares breakfast, lunch, dinner, and also packs my school tiffin.
She irons my clothes, puts toothpaste on my brush, provides hot water for my bath, and serves warm, freshly made meals.

Only those who have felt a mother's love and sacrifice truly understand her importance.
If we suddenly face a snake, a wild animal, or a major accident, the first word that escapes our mouth is “Aai” (Mother) — “Aai Go! I’m saved!”

In our happiness, sorrow, and struggles, our mother always stands by us.
Sometimes when someone asks me, “Are you her daughter?” —
The happiness I feel at that moment is beyond words.

My mother works very hard for me.
She has taught me how to pray properly and has given me good values along with a good education.

What should I even say about my mother?
Honestly, words fall short…
Celebrating you on this special day that belongs to you.

Dear God, 
Please bless my mom with good health and life,
Fulfill her wishes 
Shower your blessings on her.
Protect her from all the harms.



                     माझी प्रिय:आई

आई, आम्मा, मॉम — आणि अजून अनेक नावांनी आपण तिला हाक मारतो.
आई म्हणजे आकाशातील तो तारा, जो अंधारातही प्रकाश देतो. तशीच माझी आईही, माझ्या आयुष्यात प्रकाश टाकते.
जीवनात चांगले आणि वाईट निर्णय घेण्यासाठी ती मला मार्गदर्शन करते.

ती माझी दीपस्तंभ आहे, जी मला जीवनाच्या वादळांमधून मार्ग दाखवते,
अस्तित्वाच्या खोल आणि विशाल महासागरातून प्रवास करण्यास मला मदत करते.
आईचे प्रेम अतुलनीय आहे -
हे प्रेम तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळणार नाही,
कारण ते अमूल्य, शुद्ध आणि शाश्वत आहे.

तिचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो.
सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचं जेवण आणि शाळेत जायचा माझा डबा — सर्व ती तयार करून देते.
कपडे इस्त्री करून ठेवते, ब्रशला कोलगेट लावून ठेवते, आंघोळीसाठी गरम पाणी देते आणि गरम गरम जेवण वाढते.

आईचं महत्त्व त्यालाच समजतं ज्याने तिचं प्रेम आणि त्याग अनुभवला आहे.
कधी मोठा साप समोरून आला की लगेच आपण म्हणतो आई ग आता काय करायचं? याचा अर्थ काय होतो संकट समई आपण आईचे नाव घेतो.
आपल्या सुखदुःखात आणि संकटात आई नेहमी आपल्या पाठीशी असते.
कधी रस्त्यावर कोणी विचारलं, “तू तिची मुलगी आहेस का?”
तेव्हा मनाला जे समाधान वाटतं, तो आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही.

माझी आई माझ्यासाठी खूप कष्ट करते.
तिने मला चांगल्या प्रार्थना शिकवल्या आणि चांगले संस्कार दिले.
शिक्षणाबरोबरच योग्य वागणूक काय असते, हे तिच्याकडूनच शिकलो.

आईवर काय बोलावं? खरंच, शब्दच अपुरे पडतात...

प्रिय देवा, 
माझ्या आईला चांगले आरोग्य आणि आयुष्य दे,
तिच्या इच्छा पूर्ण कर. 
तिच्यावर आशीर्वादांचा वर्षाव कर.
तिचे सर्व संकटांपासून रक्षण कर.




Comments

Popular Posts