वंशाचा दिवा काळा नको...
वंशाचा दिवा काळा नको....
खूप विचार केला, मग लक्षात आलं — वंशाचा दिवा गोरा का हवा? काळा असला तर काय, तो/ती म्हातारपणी तुम्हाला बघणार नाही का?
समाजात लोकांनी एक अशी नकारात्मक दृष्टी (stereotype) बनवून ठेवली आहे, जी आजही बदलू शकत नाही.
आपल्याच प्रियजनांकडून मिळणाऱ्या (rejection)चं हे समाजानेच एक (propaganda) बनवलं आहे.
हो, हे सगळं (overhyped) आहे.
जावई काळा असला तरी चालतो, पण सून मात्र गोरीच हवी — का?
कारण तीच वंशाचा दिवा देणारी असते, आणि म्हणे तो दिवा काळा नको, गोराच हवा.
सुनेला नको-नको ते टोमणे मारायचे, आणि पोरीला गोड बोलायचं — हेच आजच्या समाजाचं चित्र आहे.
मुलासाठी बायको गोरी हवी, सरकारी नोकरीतली हवी — अशा नको-नको त्या अपेक्षा!
बैठकीत बसून ठरवतात आणि घरी येऊन मुलाला सांगतात — “आम्हाला सून गोरी आणि देखणीच हवी.”
आणि मग पर्याय नसलेला मुलगा आपल्या पाच-दहा वर्षांच्या नात्याला (relationship) नको-नको ती कारणं देऊन संपवतो —
म्हणे, “तुझ्यासोबत माझं भविष्य (future) नाही.”
का बरं तुझं (future) नाही?
प्रेम केलं तेव्हा विचारलंस का आईला? मग आता काय झालं?
म्हणतो — “आईला वंशाचा दिवा काळा नको.”
व्वा! खूप छान विचार आहेत तिचे!
समाजातील लोक फक्त दुसऱ्यांचं मन विचलित करण्याचं काम करतात.
आणि जे त्यांचं ऐकतात — तेही कठोर मनाचे असतात.
One day, all these stereotypes that are being overhyped by society should stop, or else relationships between lovers will be destroyed by this propaganda.
Comments
Post a Comment