आई, उडू का मी?
आई, उडू का मी?
आई, आई, आई...... अग, कुठे गेलीस मला एकटीला सोडून? तुला माहित आहे ना, मी घरात आणि समाजात एकटी असले की घाबरते. मी दरवाजामागे रडत बसले होते. इतक्यात दारावर बेल वाजली. मी दार उघडलं, आणि काय बघते तर—माझी आई माझ्यासमोर उभी!
माझ्या डोळ्यातल्या पाण्याच्या लाटा पाहून तिने मला मिठीत घेतलं आणि विचारलं,
“अगं मनी, काय झालं गं? का रडतेस?” “आई, तू कुठे गेली मला न सांगता?”
“मनी, मी फक्त बाजारात गेले होते.” माझं मन अजूनही धडधडत होतं. “मला वाटलं, तू मला या क्रूर समाजात एकटीला सोडून कुठे निघून गेलीस.” आईने माझे अश्रू पुसले, "डोळे पुस गं." मी बाजारातून तुझ्यासाठी खाऊ आणलाय.”
“व्वा, मजा आहे आता!”
हळूहळू मी मोठी होत होते. “आई, एक प्रश्न विचारू का?”
“कोणता गं, मनी?”
“आई… उडू का मी?”
आई हसली, “हा हा! कुठे उडणार गं?”
“आई, आता मी शाळेत जाते, मग कॉलेजला जाईन, आणि त्यानंतर मला माझ्या आवडीचा मार्ग निवडायचा आहे.”
“कोणता बर तो मार्ग, मनी?”
“आई, मला पायलट व्हायचं आहे!”
आई क्षणभर थबकली, “अरे बापरे! पायलट?”
“हो आई, पायलट. चालेल ना?”
“हो गं, का नाही चालणार! मी देवाकडे तुझ्यासाठी खूप प्रार्थना करेन. बाबा असते तर खूप आनंदी झाले असते.”
पण स्वप्नाइतकाच मोठा प्रश्न पुढे उभा होता- पैसा.
“आई, एवढा पैसा कुठून आणणार?” मनी शांतपणे म्हणाली,
मनी, त्याचं तू काहीही विचार करू नकोस. "मी माझं सोनं विकेन आणि तुला पायलट बनवेन.”
“आई, नको गं! ते सोनं तुझं आहे.”
“अगं मनी, माझं सोनं तूच आहेस. मी काय करणार त्या दागिन्यांचं? "मी पायलट झाली की तुला नवीन सोनं करून देईल."
अग मनी मी या वयात नटून कुठे जाणार?
मी हसले, “आई, या २१व्या शतकात अजून असा विचार करतेस?”
पायलटचे बनण्याचे फॉर्म निघाले. माझं सिलेक्शन झालं. कॉलेज सुरू झालं. कष्ट, अभ्यास, आणि आईच्या आशीर्वादाने काही वर्षांत मी पायलट झाले.
पहिला पगार मिळाल्यावर देवाला त्याचा वाटा दिला, आणि आईला तिचा—नवीन सोनं बनवून दिलं.
आई म्हणाली,
“मनी, आकाश खूप विशाल आहे. आकाश कोणाचंच नसतं.
तुला जितकं हवं तितकं उड.
तुला गरज असेल तर मी माझे पंखही तुला देईन.
समाजाला घाबरू नकोस. कोणाची वाट पाहू नकोस".
"फक्त उड".
For My Mother-
You have fulfilled all my dreams even when you had so little.
You taught me that the sky belongs to no one and gave me the courage to soar.
By sacrificing your own comforts and selling what you had,
you gave me the opportunity to study in my dream college.
You went to bed hungry, yet made sure I was fed.
I will never forget your endless love,
your struggles, and the way you turned every “NO” into a “YES” for ME.
Thank you, from the deepest part of my heart.
आई, उडू का मी? < आई, उडले गं मी!
Comments
Post a Comment